गौरी पुजन – महालक्ष्मी पुजन | Marathi Festival | Gouri Pujan Status

 गौरी पूजन – महालक्ष्मी सण – Marathi Festival – Gouri Pujan स्टेटस 

गौरी पूजन स्टेटस


गौरी पुजन हा महाराष्ट्रामधील फार महत्त्वाचा सण आहे , हा सण आपण सर्व जण दरवर्षी साजरा करतो , गणेश उत्सवाच्या सोबत  हा सण येतो 

 ….त्या निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…

काही ठिकाणी या उत्सवाला लक्ष्मी पुजन असे ही म्हणतात..

#महालक्ष्मी पूजन #गौरी पुजन 

______________________________________

आली आली गं गौराई, माय माझी माहेराला

चला चला गं सयांनो, ताट घेऊ पुजनाला

तिचं शिण काढूया गं, तिला जेवू घालूया

तिला भरजरी पैठणीचं, पदर देऊया

गौरी पूजेच्या शुभेच्छा !

______________________________________

पंच पक्वान्नाचा भोज करू, सोळा भाज्यांचा नैवेद्य

करुन पूजा आणिआरती, शेवटी पानांचा विडा करी देऊ

आई भुलचुक मजशी माफ करो, सुख समृध्दीचे दान पदरी घालो

गौरी पूजनाच्या शुभेच्छा !

 _____________________________________

गौरी आली, सोन्याच्या पावली…

गौरी आली, चांदीच्या पावली…

गौरी आली, गाई वासराच्या पावली…

गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली…

______________________________________

गौरी गणपतीच्या आगमना,

सजली अवधी धरती,

सोनपावलाच्या रुपाने

ती येवो आपल्या घरी,

होवो आपली प्रगती,

लाभो आपणास सुख समृद्धी

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा .

______________________________________

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी,

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा !

______________________________________

पौराणिक कथेनुसार, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. 


 पोस्ट शोध साठी : #गौरी पुजन# महालक्ष्मी पुजन #Gouri Pujan In Marathi#गौरी पुजन – महालक्ष्मी पुजन – Marathi Festival – Gouri Pujan Status






Leave a Comment