150+ Best Marathi Charolya, Poem | मराठी चारोळ्या, कविता 2021

मराठी चारोळ्या कविता मराठीमधे | Marathi Poem 2021

मराठी भाषा ही फार सुंदर आहे , तिच्या वेगवेगळ्या शब्दात , वाक्यात छान कविता , चारोळ्या निर्माण होऊ शकतात .
अश्याच काही मराठी चारोळ्या आज तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे. त्यामध्ये तुम्हाला छान पैकी कविता मिळतील. यामध्ये तुम्हाला तुमच्या WhatsApp वर ठेवायला , छान पैकी वोळी मिळतील . चला तर मग पाहू .

______________________________________

ह्रदयावर डोकं ठेव ,
बघ काय ऐकू येतं का…
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
नाव तुझंच येतं का ?…

______________________________________

ह्रदयातील माझी जागा तुझ्या
येण्याने भरुन गेली…
तू गेल्यावर ती जागा तुझ्या
आठवणींत बूडून राहीली…

______________________________________

ह्रदयात येऊन बघ अजून
त्याला तुझीच गरज आहे…
तू गेल्यानंतरही त्यात
तुलाच प्रेमाने जपत आहे…

______________________________________

Marathi Charolya | मराठी चारोळ्या 

Marathi Kavita , Charolya 


ह्रदयात एक जखम
आजही सळत होती…
आठवण तुझी, का?
मलाच छळत होती…

______________________________________

ह्रदयरुपी मंदिरात आई
तुझीच आहे मूर्ती …
त्यात तूच माझा देव,
आणि तुझीच गातो आरती…

______________________________________

ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्याशिवाय
काहीच मागत नाही…
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही…

______________________________________

ह्रदय माझं हल्ली थोडं
वेड्यासारखं वागतं
तू ह्रदयात असतेस तरीही
बाहेर शोधायला लागतं 

______________________________________

ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?

______________________________________

ह्या पडणाऱ्या पावसात 
तुझ्या सोबत भिजु वाटतं..
पण तु आजारी पडशील म्हणूनच 
तुझ्या सोबत भिजायला मन माझं घाबरतय…

______________________________________

होती लाही लाही झालेली तिची काया
आता रूप अन रंग हि उजळलेला
अशी पांघरली धरतीने हिरवाई
जणू हिरवा शालू नववधुने ल्यालेला

______________________________________

होण्या फुलपाखरु सुरवंटाचे
नेहमीच सदभाव दाखविला…
पण ज्याने-त्याने स्वबुद्धिने
दुषणांचा मज़ डाग लाविला…

______________________________________

होकारांला शब्दांना महत्व नसते
दाटल्या भावानांना काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची गरज नसते..

______________________________________

हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुक्या डोळ्यांनीच पाहिले

______________________________________

हे प्रेमाचं असचं असत..
थोडसं अवघड अन थोडं सोप असत..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं..

______________________________________

हे आपला अबोल प्रेम 
असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
 एकदा तरी खुलू दे

______________________________________

हृदयात नेहमीच तुझ्यासाठी
थोडी जागा जपून ठेवतो…
कधीतरी येशील म्हणून त्या
जागेवर फुले पांघरूण ठेवतो…

______________________________________

हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात 
तुझीच आठवण ताजी आहे…
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे…

______________________________________

हृदयाचे जग रिकामे आहे … 
जेव्हा पासून तू गेली आहेस…

______________________________________

हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाची तरी……
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोणाच्यातरी मनाची रानी…

______________________________________

ही भेटच नाही तर फक्त
एक माझी आठवण आहे
हे फक्त शब्दच नव्हे, यात
विचारांची साठवण आहे

______________________________________

ही कवितांची वही उघडा
पण जराशी जपून
नाहीतर चाहूल तुमची लागताच
शब्द बसतील लपून..

______________________________________

हिवाळ्यातील ही गुलाबी हवा
सोबत तू ही असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..

______________________________________

हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल…
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल…

______________________________________

हातात हात घेता तुझा,
हृदयात कंप उठले..
हळूच मन माझे 
तुझ्यात गुरफटले….

______________________________________

हातात पेन घेतले आणि तुझ्यावर
काही लिहूयात म्हंटले….
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले….

______________________________________

हातात धरलेलं पाखरु अवचित सुटावं..
तसा जीव सुटतो देहातून….
कोणी त्या क्षणांची वाट बघतं..
कोणी धास्ताऊन जात मनातून…

______________________________________

हाताच्या ओंजळीतं खूप सारी
स्वप्ने रेखाटलेली आहेतं,
ती तुझ्या आणि माझ्यासाठी
नव्याने साकारलेली आहेत 

______________________________________

हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी

______________________________________

हात तुझा हातातुन धुंद ही हवा,   
रोजचाच चंद्र आज भासतो नवा…

______________________________________

हा स्पर्श तुझा 
हा स्पर्श तुझ्या प्रेमाचा,
हा स्पर्श तुझ्या माझ्या भेटीचा…

______________________________________

हा पहाटेचा पाऊस अन
माझे डोळे मिटलेले
तुझे माझे क्षण ओवताना मनात
काही क्षण सुटलेले…

______________________________________

हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला

______________________________________

हा खेळ प्राक्तनाचा
कधी कुणा न कळल़ा
कुणा मिळते सुख पांघराया
कुणी फ़क्त दु:ख ल्याला

______________________________________

हसतेस इतकी सुंदर की,
तुझ्याकडे बघत बसतो…
आठवणीत मग तुझे ते
गोड हसणेच पाहत असतो…

मित्रांनो कशी वाटली पोस्ट , आवडली असेल तर कमेंट करून सांगा . धन्यवाद.

आज आपण या मधे पाहिलं की , मराठी कविता, चारोळ्या , मराठी प्रेम कविता  , हे सर्व .

Leave a Comment