Ganpati Aarti Lyrics In Marathi | गणपतीची आरती संग्रह

आपल्या भारत देशात सर्वप्रथम ज्या देवाची पूजा करतात तो म्हणजे आपले गणपती बाप्पा , कोणताही फंक्शन असो किंवा कार्यक्रम आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा करूनच होते , पूजा असेल तर मग आरती तर नक्कीच आसेल , त्यामुळे आज मी आपल्या काही ganpati aarti lyrics marathi बाप्पाच्या आरती, स्त्रोत, आणि लोटांगण यांची लिरिक्स घेऊन आलो आहे म्हणजेच संग्रह घेऊन आलो आहे , चला तर मग बघुयात.


ganpati aarti lyrics marathi -गणपतीची आरती संग्रह 


सुखकर्ता दुखहर्ता आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडीत मुगुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणी घागरिया ॥२॥

जय देव.. जय देव…

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ दास रामाचा वाट पाहे सदना ॥ संकटीं पावावें निर्वाणी रक्षावें सुरवर वंदना ॥ ३ ॥

जय देव.. जय देव..

__________________________________

तू सुखकर्ता तू दुःखकर्ता आरती मराठी

तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया । संकटीं रक्षीं शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु ॥

मंगलमूर्ति तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ॥ तुझिया द्वारी आज पातलों । नेईं स्थितिप्रति राया ॥१॥

संकटीं रक्षी…

तूं सकलांचा भाग्यविधाता । तूं विद्येचा स्वामी दाता ॥ ज्ञानदीप उजळून आमुचा । निमवीं नैराश्याला ॥२॥

संकटीं रक्षी…

तूं माता, तुं पिता जगं या । ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या ॥ पामर मी स्वर उणे भासती । तुझी आरती गाया ॥३॥

संकटीं रक्षी…

मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरया ॥

__________________________________

ganpati aarti lyrics marathi

गणपती काकड आरती

उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख । ऋद्धिसिद्धिंचा नायक । सुखदायक भक्तांसी ।।ध्रु.।।

अंगी शेंदुराची उटी । माथां शोभतसे कीरिटी । केशर कस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरी ।।१।।

कानीं कुंडलांची प्रभा । सूर्यचंद्र जैसे नभा। मारजीं नागबंदशोभा। स्मरतां उभा जवळी तो ।।२।।

कांसे पीतांबराची घटी । हाती मोदकाची वाटी । रामानंद स्मरतां कंठीं । तो संकटी पावतो ।।३।।

__________________________________

घालीन लोटांगण आरती मराठी 

घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमें आलिंगीन आनंद पूजन भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धुः सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् । करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कूष्ण कूष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।। ।। गणपतिबाप्पा मोरया ।।

__________________________________

शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको आरती

शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सूत गौरीहरको ।। हाथ लिए गुडलड्डू साईं सुरवरको ।। महिमा कहे ना जाय लागत हूँ पदको ।। १ ।।

जय जय श्री गणराज विध्यासुख्दाता।। धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता।।

अष्तो सिद्धि दासी संकटको बैरी।। विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी।। कोटि सूरजप्रकाश ऐसी छबि तेरी।। गंडस्थल मद्मस्तक झूले शशिहारी।। २ ।।

जय जय श्री गणराज विध्यासुख्दाता।। धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता।।

भावभागत से कोई शरणागत आवे।। संतत संतत सभी भरपूर पावे।। ऐसे तुम महाराज मोको अति भावे।। गोसावीनंदन निशिदिन गुण गावे।। ३ ।।

जय जय श्री गणराज विध्यासुख्दाता।। धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता।।

__________________________________

प्रथम तुला वंदितो आरती


प्रथम तुला वंदितो
कृपाळा, गजानना, गणराया… ॥धृ॥

विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया ॥१॥

सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया ॥ २॥

गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता रिद्धि सिद्धीच्या वरा, दयाळा देई कृपेची छाया ॥३॥

__________________________________

आरती संग्रह पोस्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद.


Search Terms : ganpati aarti lyrics marathi -गणपतीची आरती संग्रह,प्रथम तुला वंदितो लिरिक्स,गणपती आरती संग्रह , गणपती बाप्पा मोरया, 

Leave a Comment