Mahashivratri Chya Hardik Shubhechha | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | महादेव , भोलेनाथ , शिवशंकर स्टेटस

Mahashivratri Chya Hardik Shubhechha | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | mahashivratri wishes in marathi | महादेव स्टेटस मराठी

नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मधे महाशिवरात्र माहिती, महादेव स्टेटस मराठी, mahashivratri chya hardik shubhechha in marathi, महाशिवरात्री माहिती, mahashivratri chya shubhechha, महाशिवरात्री माहिती 2020, mahashivratri wishes marathi, mahashivratri caption in marathi, हे सर्व पाहणार आहोत. महाशिवरात्री हा सण आपल्या भारतात सर्वत्र साजरा करतात, त्यासाठी आपल्याला WhatsApp ठेवण्यासाठी छान असे स्टेटस सुध्दा घेऊन आलो आहे. महाशिवरात्री ची माहिती पण तुम्हाला या पोस्ट मधे पहायला मिळेल. व्हिडिओ स्टेटस साठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यामधे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ स्टेटस download करायला मिळतील. महादेव , भोलेनाथ , शिवशंकर, नाव घेतलं की आपल्याला महादेव यांचं चित्र डोळ्यापुढे येत. डमरूधारी, कैलासवासी, अश्या बऱ्याच नावाने आपले भोलेनाथ सर्वांना माहीत आहेत. 

महादेव स्टेटस मराठी


महाशिवरात्री माहिती | महाशिवरात्री ची कथा

महाशिवरात्रीला शंकराची पूजा करुन रुद्राभिषेक व उपवास करतात. या दिवशी बेलाच्या पानाला विशेष महत्त्व असते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीची जत्राही भरते. एकेका हिंदू देवतांची स्वत:च्या आवडीची फळे-फुले कोणती ते ठरलेले आहे. शंकराला बेलाचे त्रिदल आणि धोत्र्याचे फूल प्रिय आहे.

                महाशिवरात्रीविषयी एक कहाणी प्रसिध्द आहे. फार पूर्वी एक शिकारी शिकार करण्याकरितां अरण्यात गेला होता. तो झाडावर दबा धरुन बसला. ते झाड बेलाचे होते. परंतु शिकार करण्याच्या दृष्टीने झाडाच्या फांद्या आड येऊ लागल्या. म्हणून त्याने बेलाची पाने तोडण्यास सुरवात केली. त्या झाडाखाली शंकराची एक पिंड होती. त्या पिंडीवर आपोआप बेल पडू लागला. इतक्या अवधीत पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. त्या शिका-याने तिच्यावर नेम धरला. याची हरिणीला चाहूल लागली. तेव्हा तिने शिका-याला सांगितले की माझी लहान बाळे घरी आहेत. त्यांना मी भेटून सूर्योदयापूर्वी पुन्हा इकडे येते. मग माझी शिकार कर. शिका-याने तिचे म्हणणे कबूल केले. हरिणी परत येण्याची तो वाट पाहू लागला. रात्रभर झाडावर राहिल्याने त्याला आपोआपच उपवास घडला. शिका-याला सांगितल्याप्रमाणे हरिणी तेथे हजर झाली.

                  तिचा प्रामाणिकपणा पाहून शिका-याचे अंतःकरण द्रवले. त्याला तिची दया आली व तिला मारायचे नाही असे त्याने ठरवले. या सर्व गोष्टीमुळे शंकर शिका-यावर प्रसन्न झाले. आणि त्यांनी शिका-याला व हरिणीला विमानांत बसवून उध्दरून नेले. म्हणून जे लोक महाशिवरात्रीचे व्रत करतील ते सदैव सुखी रहातील असे म्हंटले जाते.

                  या दिवशी सर्वांनी उपवास करण्याची पध्दत आहे. सकाळी स्नान वगैरे करून शंकराला जाऊन बेलाची पाने व कवठ हे फळ शंकराला वाहिले जाते. आंब्याला या सुमारास मोहोर येतो. महाशिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहण्याचीही प्रथा आहे. हाताने तयार केलेल्या कापसाच्या दो-याच्या ७५० वाती करून शंकराच्या देवळात किंवा घरातील देवापुढे या वाती तुपांत भिजवून लावल्या जातात. उत्तर भारतात या दिवशी खसखस व थंडाई घालून भांग पिण्याची पध्दत आहे. घरोघरी साबुदाणा खिचडी, रताळी, बटाटे यांपासून केलेले जिन्नस वगैरे खाण्याची प्रथा आहे.

                  

mahashivratri wishes in marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
       ॐ नमः शिवाय
 महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा

____________________________________

शिव शंकराची शक्ती,
शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि 
एक चांगली सुरुवात होवो,
हीच  शिव शंकराकडे प्रार्थना…🙏
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
____________________________________

     महादेव स्टेटस मराठी

हे शिवशंभो!.. सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भलं कर, कल्याण कर,रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे…!!!
॥ ॐ नमः शिवाय ॥
____________________________________

बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो 🙏वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला .
महाशिवराञी च्या शुभेच्छा

महादेव स्टेटस मराठी

____________________________________

  शिव शंभो तुम्हाला भरभराटी., उत्तम आरोग्य., सुख समृद्धी प्रदान करोत., तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो., शिव शंकरांचा आशिर्वाद आणि कृपा सर्वांवर अखंड राहो..!!!

  ____________________________________

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
 “महाशिवरात्रीच्या” हार्दिक शुभेच्छा
    || हर हर महादेव ||
    शुभ सकाळ
 तुमचा दिवस आनंदात जावो

____________________________________

🚩🚩🚩🚩🚩🚩

शिव 🔱सत्य आहे,
शिव🐍 सुंदर आहे,
शिव 🚩अनंत आहे,
शिव 🌸ब्रम्ह आहे,
शिव 🌙शक्ती आहे,
शिव 🙏🏻भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!🌸

🚩🚩🚩🚩🚩🚩

____________________________________

शिव 🔱शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या 🐍पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
🚩महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
____________________________________

आपणास आणि आपल्या कुटुंबास “महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”….. 
आपल्या कुटुंबावर सदैव शिवशंभुची कृपा राहो..!

____________________________________

कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी | कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी |महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा..
हर हर महादेव..
हर हर भोले.. महाशिवरात्री शुभेच्छा

____________________________________

शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!

____________________________________

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा !

महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा मराठी
____________________________________

शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
____________________________________

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
____________________________________

शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या 2020 शुभेच्छा

____________________________________

बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे, भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे

____________________________________

बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे, भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे

____________________________________

शिव सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे शिवभक्ती आहे हया महाशिवरात्री च्य तुहळा मानपुरवाक शुभेचा
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे

____________________________________

ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..जय शिव शंकर..महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा

____________________________________

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

____________________________________

शिवाचा महिमा आहे अपरंपार, भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार, त्याची कृपा आपल्यावर कायम राहो, आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो…महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा

____________________________________

हर हर महादेव, बोलतो आहे प्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण, आनी मोली तुहळा सुख समृद्धी आनी धन. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

____________________________________

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri !

____________________________________

Cover Topics : mahashivratri chya hardik shubhechha, महाशिवरात्री ची कथा, mahashivratri sms marathi, महाशिवरात्र माहिती, mahashivratri chya hardik shubhechha in marathi, महाशिवरात्री माहिती, mahashivratri chya shubhechha, महाशिवरात्री माहिती 2020, mahashivratri wishes marathi, mahashivratri caption in marathi, महादेव स्टेटस मराठी, महादेव स्टेटस मराठी, mahashivratri msg in marathi, mahashivratri marathi wishes, mahashivratri wishes images in marathi, 

मित्रांनो पोस्ट आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा, तुमच्या कडे जर काही स्टेटस असतील तर कॉमेंट मधे लिहा आम्ही पोस्ट मधे Add करू , धन्यवाद.

व्हिडिओ स्टेटस डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा.

Join Telegram Channel

Leave a Comment